MVA News : शरद पवार - उद्धव ठाकरे यांची बैठक; तासभर चालली चर्चा | VIDEO

Sharad Pawar - Udhhav Thackeray Meeting : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उबाठाचे काही प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये आज तासभर चर्चा झाली आहे. सिल्व्हर ओकवर या दोघांची सोमवारी भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्यात साधारणत: तासभर चर्चा झाली असल्याचं बघायला मिळालं आहे. या बैठकीत जयंत पाटील, आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि संजय राऊत देखील सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. मविआच्या पुढच्या रणनीतीबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या तासभरापासून सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू होती. ही बैठक् आता संपली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनितीबद्दल चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या तासभर चाललेल्या या बैठकीत आणखी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com