Mumbai Rain : साखरझोपेत असताना घरावर दरड कोसळली, बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी|VIDEO

Mumbai Vikhroli Landslide Family Killed: मुंबईतील विक्रोळी पार्क साइट येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी आहेत. पहाटे ही घटना घडली असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Summary
  • विक्रोळी (पश्चिम) पार्क साइट परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळली.

  • एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.

  • मृत व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • मुसळधार पावसामुळे परिसरातील भूस्खलन प्रवण भागात दुर्घटना घडली.

मुंबई : विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर भागात शनिवारी पहाटे घटना घडली. डोंगराळ भागातील माती व दगड घसरून एका झोपडीवर कोसळल्याने चार जण जखमी झाले. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १६ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे २.३९ वाजता घडली असून सकाळी ५.५० वाजता अधिकृत अद्ययावत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलिस व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर निखिल (AMO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोघांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले तर दोघांवर उपचार सुरू आहेत. मृत व जखमींची ओळख पुढीलप्रमाणे आहे :

शालू मिश्रा (वय १९, महिला) – मृत

सुरेश मिश्रा (वय ५०, पुरुष) – मृत

आरती मिश्रा (वय ४५, महिला) – ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल

ऋतुराज मिश्रा (वय २०, पुरुष) – ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com