Video : दहाव्या मजल्यावरुन महिला पडली, झाडामुळे बचावली, रेस्क्यू ऑपरेशन

Bhandup woman falls from 10th floor and survives after getting caught in tree branches : इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडलेली महिला इमारतीखाली असलेल्या झाडामुळं बचावली. अग्निशमन दल, पोलिसांनी तिला झाडावरून सुखरूप खाली उतरवलं.

मुंबईतील भांडुपमध्ये एका इमारतीच्या १० व्या मजल्यावरून महिला पडली. सुदैवानं ती झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. त्यामुळं ती बचावली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य हाती घेतलं. बऱ्याच वेळानंतर या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली.

भांडुपच्या एका एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून एक महिला खाली पडली. या इमारतीला लागूनच असलेल्या झाडावर ती अडकली. झाडाच्या फांद्यांमध्ये ती अडकल्यानं तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले. बऱ्याच वेळानंतर तिची सुटका करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com