Mumbai Rain : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया; अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Mumbai Rain update : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया पाहायला मिळाला. अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची तारांबळ उडाली.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. मुंबईच्या दादर, परळ, भायखळा भागात गेल्या विजेच्या कडकडटांसह पाऊस सुरु आहे. अचानक कोसळलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. गेल्या अर्धांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे सखल भागात पाणी साचलं.

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्येही जोरदार पाऊस कोसळला. नवी मुंबईतही अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे गरबारसिकांचा हिरमोड झाला. पावसामुळे गरबा खेळणाऱ्यांचा डाव अर्ध्यात थांबला. या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला. तर या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे घराकडे परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com