Mumbai Local: लोकल रुळावरून घसरली; पश्चिम रेल्वेची वाहतूक 3 तासांपासून विस्कळीत

Mumbai Western Local: पश्चिम रेल्वेच्या धिम्या गतीच्या लोकल सेवा विस्कळीत झालीय. गेल्या तीन तासांपासून रेल्वे सेवा विस्कळीत झालीय.

दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसं काहीसा अनुभव मुंबईकरांना आज आला. रविवार असल्याने मेगाब्लॉकमुळे संथीगतीने धावणाऱ्या लोकल तीन तासांपासून वाहतूक ठप्प झालीय.मुंबई सेंट्रलजवळ लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. यार्डमध्ये जात असताना एका लोकल रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरला त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीय.

रुळावरून लोकल घसरल्याने हानी होण्याची शक्यता असते, परंतु सुदैवाने कोणत्याच प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती हाती आलीय. गेल्या तीन तासांपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.अधिक माहितीनुसार, १२ ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या धिम्या गतीच्या लोकल रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. एक लोकल यार्डमध्ये जात असतांना एक डबा रुळावरून खाली घसरला. त्यामुळे मागील सर्व लोकल रेल्वे ह्या खोळंबल्या आहेत. जोपर्यंत हा डबा रुळावर आणला जात नाही तोपर्यंत कोणतेही रेल्वे वाहतूक सेवा चालू होऊ शकत नाही. त्यामुळे अजून दोन ते तीन तासाचा अवधी लागू शकतो, अशी माहिती साम प्रतिनिधींनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com