Water Crisis: मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; फक्त इतका पाणीसाठा शिल्लक, VIDEO

Mumbai Faces Water Crisis: उन्हाच्या कडक तडाख्यामुळे आधीच मुंबईकर हैराण झाले असतानाच आता या तीव्र उन्हाचा परिणाम मुंबईला पणीपुरवठा करणाऱ्या धरणांवर झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ ४२ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उष्णतेची झळ बसू लागली असून, वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी, जलसाठ्यात घट होत आहे.

मुंबईत पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने पाणीकपात लागू केली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन प्रभावित होत आहे. भविष्यात पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com