सचिन कदम | रायगड
शिमगोत्सवासाठी गावची अर्थात कोकणची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूरजवळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका मुंबई आणि परिसरातून कोकणात निघालेल्या शेकडो कुटुंबीयांना बसला आहे. दुसरीकडे, कोकणातून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारी वाहनेही दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत अडकली आहेत.
शिमगोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकले आहेत. माणगाव आणि इंदापूरजवळ वाहने अडकली आहेत. वाहनांची जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. कासवगतीने ही वाहने पुढे सरकत आहेत. भरउन्हात वाहतूक कोंडीतून वाट काढताना कारचालकांना कसरत करावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने माणगाव-इंदापूरमध्ये रस्ता अरुंद असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.