Mankhurd: मित्रांसोबत खेळायला गेला, तो परतलाच नाही! 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Mankhurd Tragedy News: आयुष राजेश शेगोकार असे या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सकाळी त्याच्या घरापासून जवळ मानखुर्द रेल्वे स्थानक लगत असलेल्या आणि पाण्यानी भरलेल्या खड्ड्याजवळ मित्रांसह खेळायला गेला होता.

मुंबई : मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. आयुष राजेश शेगोकार असे या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सकाळी त्याच्या घरापासून जवळ मानखुर्द रेल्वे स्थानक लगत असलेल्या आणि पाण्यानी भरलेल्या खड्ड्याजवळ मित्रांसह खेळायला गेला होता. अचानक तो खड्डात पडला आणि बुडाला. या वेळी मानखुर्द रेल्वे स्थानकात उभ्या प्रवाश्यांनी हे दृश्य बघितले आणि त्या खड्ड्याकडे धाव घेतली. या वेळी लोहमार्ग पोलिस देखील तिथे दाखल झाले. त्यानी तत्काळ खड्ड्यात बुडालेल्या आयुषला बाहेर काढले. पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com