Atal Setu Women Video : अटल सेतूवरुन महिला उडी मारणार तोच टॅक्सीचालकाने केस पकडले; पोलिसही देवदूतासारखे धावले

Mumbai Atal Setu Women Viral Video : मुंबईतील अटल सेतूवरुन एका महिलेने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी टॅक्सी चालकाने तिचे केस पकडले. त्यामुळे ही महिला पुलावरच लटकली.

मुंबईतील अटल सेतूवरुन एका महिलेने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी टॅक्सी चालकाने तिचे केस पकडले. त्यामुळे ही महिला पुलावरच लटकली. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जीवाची बाजी लावत महिलेचा जीव वाचवला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

रीमा पटेल (वय 56) असं या महिलेचं नाव असून ती मुलुंड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रीमा यांनी शुक्रवारी एक कॅब बूक केली आणि त्या अटल सेतूच्या दिशेने गेल्या. तिथे त्यांनी कॅबचालकाला गाडी थांबवण्यास सांगितली.

त्यानंतर त्या उड्डाणपुलाच्या रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभ्या राहिल्या. रीमा समुद्रात उडी मारणार इतक्यात कॅबचालकाने प्रसंगावधान दाखवले. त्यांनी रीमा यांचे केस धरून ठेवले. दरम्यान, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

त्यांनी तातडीने वाहतूक पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमला या घटनेची माहिती दिली. सूचना मिळताच लगेचच 4 ते 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी अटल सेतूच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी महिलेला कसेबसे वर खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेचा जीव वाचवण्यासाठी टॅक्सी चालकासह पोलिसांनी देखील आपला जीव धोक्यात टाकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com