Mumbai News: विदेशी महिला मुंबई एअरपोर्टवर उतरली; झडती घेतली असता २२ कोटींचं घबाड सापडलं, VIDEO

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल 22 कोटींचे कोकेन जप्त केले आहे.

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज 2 किलो 178 ग्रॅम वजनाचे सुमारे 22 कोटींचे कोकेन एका महिलेकडून जप्त केले आहे. या संदर्भात एका परदेशी महिला प्रवाशाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चेक इन बॅगेत हे कोकेन सापडले असून संबंधित महिला ही नैरोबी या पूर्व आफ्रिकेच्या केन्या देशातून असल्याचे सांगितले जात आहे. चौकशी करताना हा प्रवासी अस्वस्थ व चिंतित असल्याचे आढळून आले. या महिलेच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करणार सुरू असल्याचे महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com