VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sanjay Raut Latest News : शिवसेना कोणाची यासाठी आम्हाला राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, त्यांना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत, असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना कोणाची यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तसंच राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत असंही राऊत यांनी म्हंटलं आहे. तर धनुष्यबाणाचे अधिकृत अध्यक्ष हे एकनाथ शिंदेच असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर आरोपाचे ताशेरे ओढले जात असल्याचं दिसून येत आहे.

जनता, शिवसैनिक, धनुष्यबाण ही सगळी बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी आहे, शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे, या दोघांची ही प्रॉपर्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या घशात घालणारे मोदी शहा कोण? निवडणूक आयोग कोण? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे, भाजपवर टीका केली आहे. त्याच मोदी शहांची तळी आज राज ठाकरे उचलत आहेत. राज ठाकरे यांचा हल्ला मुळात मोदी शहांवर पाहिजे, अशी राऊत यांनी म्हंटलं आहे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी परस्पर एकनाथ शिंदेंना दिली. यासारखं पाप नाही, बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना माफ करणार नाही. राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत ते काय बोलत आहेत त्यावर महाराष्ट्र चालत नाही, शिवसेना कोणाची यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com