Sanjay Raut News : लाडकी बहीण योजनेवरून शिंदे - राऊतांमध्ये वार पलटवार, पाहा Video

Sanjay Raut Statement On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मविआवर निशाणा साधला होता, त्यावर आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा लाडकी बहीण योजनेला विरोध असून ते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र मी ही योजना बंद होऊ देणार नाही, त्यासाठी मला १० वेळा जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. त्यांच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सरकार बदलल्यावर आपल्याला कोणी वाचवणार नाही आहे, याची खात्री झाल्याने शिंदेंनी हे विधान केलं असल्याचं राऊत यांनी म्हंटलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे. मविआ लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मी लाडक्या बहीणींसाठी १० वेळ जेलमध्ये जायला तयार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलं आहे. त्यावर राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ''ते जर जेलमध्ये जायला तयार आहेत, तर मग ते पळून का गेले? जेलच्या भीतीने पळून जाणारा माणूस बोलतो मी जेलमध्ये जायला तयार आहे. त्यांना आता पूर्ण खात्री आहे की सरकार बदलल्यावरती जेलमध्ये जावं लागणार आहे, त्यांना कोणी वाचवणार नाही.'' असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com