Sanjay Raut : काही दिवसात वाल्मिक कराड भाजपच्या गटात बसलेले दिसतील; राऊतांचं मोठं विधान | VIDEO
अजंली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. कारण भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांचे तांडव सुरू आहे. त्यांना शासकीय मदत सुरू असल्याशिवाय ते होऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही. आमच्यावर दबाव येतो हे न्यायमूर्तीनीच सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या आधी इथे आंदोलन सुरूच होतं. लोकं रस्त्यावर आले होते. सुरेश धस यांनी तर तांडव केला आहे. बीडमधल्या दहशतवाद विरोधात तांडव सुरू आहे आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत, त्यांचं कुठे काय दुखत आहे मला माहित नाही. पण त्यांच्यासाठी स्पीकरमध्ये एक बंगला रिकामा केला आहे. हे अजित पवार यांना दिसत नाही का? हे सर्व धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असे सुरेश धस सांगत आहेत. ते भाजपचे आमदार आहेत अंजली दमानिया यांचाही भाजपचा संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार त्याच्यामुळे काय होईल आज फैसला? त्यात पडू नका, काहीही होणार नाही. काही दिवसात वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
यावेळी राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील महायुती सरकारला धारेवर धरलं. नीती आयोग आणि या देशाची शिखर बँक यांनी जी माहिती समोर आणली आहे, स्पष्ट दिसत आहे ज्या रेवडी योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या आधी मत मिळवण्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकलला गेला आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे ४५ हजार कोटींचं खड्डा आहे अजून कर्जमाफी व्हायची आहे. कर्जमाफी सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणीबरोबर तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमच्या वचनात आहे. त्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरातून आणायचे,अदाणी यांच्या खिशातून काढायचे, गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं. ज्या घोषणा केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.