Hingoli : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट, शिक्षकाचा मृत्यू, हिंगोलीतील घटना

Hingoli News : हिंगोलीमध्ये एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल सतत वापरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि चिंता करणारी बातमी आहे.

Latest Hingoli News in Marathi : तुम्ही मोबाईल फोनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे खिशातच मोबाईलचा स्फोट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मोबाईलचा स्पोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खिशात असणाऱ्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये शिक्षकाचा मृत्यू झालाय. सुरेश संग्रामे असे त्या शिक्षकाचे नाव असल्याचे समोर आलेय. नत्थू गायकवाड असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com