VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

MNS Raj Thackarey News : इतक्या कमी कालावधीत कशी तयारी करावी? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना मुंबई महानगर पालिकेकडून शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर सभेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अर्ज केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता परवानगी मिळाली तरी इतक्या कमी कालावधीत कशी तयारी करावी? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित करत आम्ही सभा घेणार नाही, असं आज पत्रकार परिषदेत बोलताना यांनी म्हंटलं होत. त्यामुळे आता परवानगी मिळाल्यानंतर याबद्दल राज ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोग अद्यापही जुन्या जमान्यातच वावरत असल्याची टीकाही यावे

राज ठाकरे यांनी १७ नोव्हेंबरला सभा घेणार नाही असे विधान केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून ११ वाजून ४० मिनिटांनी सभेला परवानगी देण्यात आली आहे. पण मनसे मात्र आता सभा घेणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. अत्यंत उशिरा सभेला परवानगी देण्यात आली आहे. मनसेने दीड महिन्याआधी परवानगी साठी अर्ज केला होता. पण उशीरा परवानगी मिळाल्याने आता मनसे सभा घेणार नाही. ११ वाजून ३२ मिनिटांनी राज ठाकरे यांनी सभा घेणार नाही जाहीर केले आणि ११ वाजून ४० मिनिटांनी परवानगी मिळाली. त्यामुळे आता यावर राज ठाकरे काय भूमिका घेतील हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com