Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Dombivli latest News : डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला चोप दिला.

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवली : डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना घडली आहे. रिक्षा चालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. रिक्षा चालकाला चोप देतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मनसे निवडणूक कार्यालय उदघाटनानंतर ही घटना डोंबिवलीत घडली आहे.

रिक्षा चालकाला चोप देताना मनसे कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांनी देखील मध्यस्थी केली. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीतून रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या रिक्षा चालकाला समज देऊन सोडल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com