MNS News : अकोल्यात कार्यकर्त्यांकडूनच मनसे कार्यालयात राडा! पाहा काय आहे प्रकरण | VIDEO
अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयाची रात्री 8 वाजता तोडफोड करण्यात आली. कार्यालयाची तोडफोड करणारे हे मनसेचेच कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. अर्जाच्या छाननीत काल वय 25 दिवसांनी कमी असल्यामुळे फेटाळला गेला होता. अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज. अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप करत मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचाही मनसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.