Shahaji Bapu Patil : खेड शिवापूरात सापडलेल्या 5 कोटींवर शहाजी बापूंचं मोठं विधान | Video
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनांमध्ये 5 कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याच ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार कोसळल्यापासून संजय राऊत यांना शहाजी बापू पाटीलच दिसत आहेत. या गाडीशी आणि त्यात सापडलेल्या पैशांशी किंवा त्या कार्यकर्त्यांशी माझा काहीही संबंध नसल्याचा खुलासा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही शहाजी पाटील यांनी केला आहे.
सांगोल्याच्या नलावडे नामक इसमच्या गाडीत 5 कोटी रुपयांची रोखरक्कम सापडली आहे. विधानसभेच्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही रक्कम आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्त्याची असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील याबद्दल सूचक ट्विट केलं आहे. त्यानंतर आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ''या रक्कमेशी आणि त्या इसमाशी माझा संबंध नाही. तो माझा कार्यकर्ता नाही. रक्कम सापडलेली गाडी ही सांगोल्याची असल्याचं देखील मला माध्यमांनी दाखवलेल्या बातमीमधूनच कळालं आहे. सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने माझ्याविरुद्ध हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे.'' असा आरोप शहाजी बापू यांनी केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.