VIDEO : फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचं धाडस भाजपात नाही; रोहित पवारांची जोरदार टीका
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले तर त्यांच्या आणखी 20 ते 30 जागा कमी होतील. अशी भीती असल्यानेच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचे भाजपाचे धाडस होत नसल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये 110 ते 120 महायुतीचे उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता आहे. मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले तर या जागा कमी होतील असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत तीनही पक्षात एकमत झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळेआता निवडणुकीतील विजयाच्या समीकरणावरच महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अवलंबून असणार आहे. आता मात्र मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर महाआघाडी आणि महायुती यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.