Imtiaz Jaleel : विजय आमचाच, राजकारणात थोडा सस्पेन्स ठेवावा लागतो; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान

Solapur Assembly Election News : सोलापूर मध्य मधून आज एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या शक्तीप्रदर्शन रॅलीमध्ये प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हजेरी लावली होती.

सोलापूर मध्य विधानसभेत मागच्या दोनवेळी आम्हाला लोकांनी अपेक्षेपेक्षा कमी मतदान केल, तरीसुद्धा यावेळेस 200% सोलापूर मध्यमध्ये विजय आमचाच होईल, असा विश्वास माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर मध्य मधून एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या शक्तीप्रदर्शन रॅलीमध्ये एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पुढे बोलताना जलील यांनी म्हंटलं की, 'यंदा महाराष्ट्रात आम्ही कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत साधारण 10 जागा लढवण्यासाठी आम्ही उमेदवारी निश्चित केलीय. कमी जागा लढवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा मानस आहे. नांदेड लोकसभा पोट निवडणूकसाठी मी अर्ज घेऊन भरून ठेवलेला आहे. उद्या दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, आम्हाला गनिमी कवा माहिती आहे. नांदेड लोकसभेच्या बाबतीत उद्या दुपारपर्यंत तुम्हाला समजेल गनिमी कावा नेमका कसा असतो. राजकारणात थोडा सस्पेन्स गरजेचं असतो, प्रत्येक गोष्ट ही उघड करायची नसते, असंही जलील यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com