बोटावरची शाई नेलपेंट रिमुव्हरनं होतेय गायब? धक्कादायक प्रकार उघड, डेमोचा VIDEO बघा

Marker Used Instead Of Indelible Ink In Election: मतदान प्रक्रियेत अमिट शाईऐवजी मार्करचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. मार्करची निशाणी सहज पुसता येते, असा आरोप होत असून बोगस मतदानाची शक्यता आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

यंदाच्या मतदान प्रक्रियेत पारंपारिक अमिट शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. नेलपॉलिश रिमूव्हरच्या साहाय्याने ही मार्करची निशाणी सहज पुसता येत असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या गंभीर मुद्द्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदार मतदानासाठी रांगा लावत आहेत. विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकूण 15,931 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

शहरांच्या विकासाची पुढील दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. दरम्यान 16 जानेवारी रोजी लागणाऱ्या निकालाबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com