Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात

Mumbai Municipal Election Raj Thackeray : मतदानानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सरकार, प्रशासन आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत “ही निवडणूक नसून फ्रॉड आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात
Raj Thackeray Statement On Election Commision Saam Tv
Published On
Summary
  • राज ठाकरे यांनी मतदानानंतर निवडणूक प्रक्रियेवर तीव्र टीका केली

  • “ही निवडणूक नाही, फ्रॉड आहे” असे म्हणत संताप व्यक्त केला

  • दुबार मतदार आणि व्हीव्हीपॅटवर गंभीर प्रश्न उपस्थित

  • मनसैनिकांना मतदान केंद्रांवर सतर्क राहण्याचे आदेश

Raj Thackeray Statement On Election Commision राज्यात सर्वत्र २९ महापालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. आज सकाळपासूनच नेते मंडळींसह सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले. ते म्हणाले की, संपूर्ण प्रशासन सध्या केवळ सत्तेसाठी मागे लागले आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असे ते म्हणाले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी वाटेल ते करायचं, असा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. ही निवडणूक नसून फ्रॉड आहे, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून होत असलेल्या कथित गैरप्रकारांबाबत त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात
Crime News : गुप्त माहिती मिळवली, खासदाराला ब्लॅकमेल करून ५ लाखांची खंडणी मागितली; बोगस आयटी कर्मचाऱ्याला अटक

पुढे ते म्हणाले की, आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगाने आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दुबार मतदारांनंतर आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसल्याने आपण दिलेले मतदान आपल्याच उमेदवाराला गेले आहे की नाही, हे कळत नाही. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे. सरकारने ठरवलेच आहे, विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लकच ठेवायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात
Baba Mondkar : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मतदानावेळेस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आजवर मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसता येत नव्हती. पण आता सॅनिटायझर लावले की शाई पुसली जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मतदानावेळी प्रत्येक केंद्रावर अत्यंत सतर्क राहा. शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकार घडत असल्यास त्यावर लक्ष ठेवा. बाहेर पडा, शाई पुसा आणि पुन्हा आत जा, असे प्रकार झाल्यास तात्काळ कारवाई करा. असे ते म्हणाले. आम्ही हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मतदानादिवशी 'वॉच' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com