मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे १०० गावांचा संपर्क तुटला; पाहा संपूर्ण गावांची यादी|VIDEO

Flood Crisis in Marathwada: मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि पूरामुळे १०० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड व धाराशिव जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरु आहे.

मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर सुरु आहे. अनेक गावांमध्ये संपर्क तुटला असून, काही ठिकाणी नागरिक पुरात अडकले आहेत. प्रशासन आणि बचाव कार्य अजूनही जोरात सुरू आहे.

परभणी:

परभणी जिल्ह्यात एकूण ३ जण पुरात अडकले आहेत.

पूर्णा तालुक्यातील चुडावा गावात १ जण पुरात अडकला आहे.

गंगाखेड तालुक्यातील शेक राजूर गावात २ जण पुरात अडकले आहेत.

हिंगोली:

येथे २ गावांचा संपर्क तुटला आहे.

लातूर:

लातूर जिल्ह्यात एकूण ६० गावांचा संपर्क तुटला आहे.

शिरूर- अनंतपाळ: ५ गाव

लातूर तालुका: १ गाव

उदगीर तालुका: १२ गाव

औसा तालुका: ७ गाव

चाकूर: १० गाव

देवणी: ७ गाव

रेणापूर: ४ गाव

निलंगा: ९ गाव

अहमदपूर: ७ गाव

उमरगा: २ गाव

लातूर जिल्ह्यात एकूण ४ जण पुरात अडकले आहेत.

चिरका अहमदपूरमध्ये: ३ जण

मौजे हळीहंडरगुळी: १ जण

नांदेड:

एकूण २८ गावांचा संपर्क तुटला आहे.

धर्माबाद: १ गाव

अर्धापुर: १ गाव

मुखेड: ३ गाव

लोहा: ८ गाव

कंधार: १ गाव

देगलूर: ८ गाव

नांदेड: ५ गाव

हदगाव: १ गाव

बीड

माजलगाव तालुक्यातील मौजे नितरुड बड्याची वाडी येथे ७ नागरिक पुरात अडकले आहेत.

एकूण ३ गावांचा संपर्क तुटला आहे. केज तालुक्यात १ गाव, माजलगाव तालुक्यात २ गाव.

धाराशिव:

३ गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब तालुक्यातील ३ गावांचा समावेश.

एन.डी.आर.एफ. पथक बचाव कार्यासाठी रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com