Maratha Reservation : सरकारला संधी...आरक्षण देऊन टाका; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार! VIDEO

Manoj Jarange Patil Warning To Goverment : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचं जाहीर केलंय. ही सरकारला संधी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मुंबई : आमचं मुख्य ध्येय आरक्षण आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा. सरकारला संधी आहे, आरक्षण देऊन टाका. समाज म्हणून आज उपोषणाला बसतोय. मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. आंदोलनापूर्वी सरकारशी बोलणं झालं नाही, माझ्यात क्षमता आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्दही बोलायचं नाही. पण आमच्या मागण्या पूर्ण करा. जर सरकारनं आरक्षण नाही दिलं, तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. आज मध्यरात्रीपासून पुन्हा मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. तर छगन भुजबळ यांना भांडणं लावायचा वाद असल्याचं त्यांनी म्हटलंय. छगन भुजबळ बुध्दीभेद करून दंगल घडणावर आहेत, असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com