मराठा आरक्षणाचा फटका EWS प्रवर्गाला! प्रवेशात तब्बल १५ टक्क्यांची घट|VIDEO

Impact of Maratha Reservation On EWS Admissions: सीईटी सेलच्या अहवालानुसार मराठा आरक्षणानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील प्रवेशांमध्ये तब्बल १५ टक्क्यांची घट झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (EWS) प्रवेशांवर झाल्याचे समोर आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, 'ईएसबीसीमुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातल्या प्रवेशामध्ये मागच्या तीन वर्षांत पंधरा टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळतंय'. या अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये EWS प्रवर्गातील ६५ टक्के जागांवर प्रवेश झाले होते, तर २०२४-२५ मध्ये हे प्रमाण ५७.२७ टक्क्यांपर्यंत घसरले. २०२५-२६ या वर्षासाठी तर केवळ ५०.३१ टक्के जागांवरच प्रवेश झाले, ज्यामुळे EWS प्रवर्गातील प्रवेशांमध्ये मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा आरक्षणानंतर अनेक विद्यार्थी SEBC ऐवजी EWS पर्यायाचा लाभ घेत असल्याने हा परिणाम झाल्याचे चित्र या आकडेवारीतून निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com