Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी जातीनिहाय जनगणना करा; खासदार प्रणिती शिंदेंची मागणी

MP Praniti Shinde : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मनोज जरांगे-पाटील यांचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणावर तोडगा काढावा. जातिनिहाय जनगणना करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी केलीय.

मराठा आरक्षणाचा प्रश्नाचा मुद्दा लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित करत त्यांनी जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केलीय. राज्यात मराठा,धनगर,ओबीसी आरक्षणावर प्रश्न निर्माण झाल्याची माहिती देत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न उपस्थित केला. आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केलीय. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असून आरक्षणावर मार्ग का निघत नाही, असा सवालही त्यांनी सरकारला विचारलाय. आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरली आहे आणि सरकार तणाव वाढवत असल्याचं खासदार शिंदे म्हणाल्या. त्यामुळे सरकारने जातीनिहाय जनगणना केली जावी आणि मराठा, धनगर समाजाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com