Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी
येवल्यात विशेष असे काहीच नाही. हा मतदारसंघ काही राज्याबाहेर नाही. येवल्याला ही माझी सांत्वनपर भेट आहे. मी इथं कुणाला पाडायचं हे सांगायला आलो नाही. मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना इथल्या मतदारांनी पाडावं, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. शनिवारी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून जरांगे यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. हे गाव आता आमच्या रस्त्यात आलं, त्याला मी बाजूला सारू का? कुणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? असं म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मराठा समाजाला विरोध करणाऱ्या दोघांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. पण त्यांचा रोख मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे होता हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट कळून आलं. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. मी ठरवले की डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. पण तो ही सारखा सारखा बिघडत आहे, असंही यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.