Manoj Jarange Patil : आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्ही संपवू, जरांगे पाटलांचा एल्गार
मराठा-दलित-मुस्लिम एकत्र आला यावर आमचं एकमत झालं आहे. मात्र, कोणत्या जागा कोण लढणार? यावर 3 तारखेला निर्णय घेणार असून आमचे उमेदवार कोण? हे 3 तारखेला जाहीर करू, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. केवळ एकट्या मराठा समाजामुळे निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजाशीही समीकरण जुळवण्याचा मनोज जरांगे प्रयत्न करत आहेत. याच संदर्भात एक निर्णायक बैठक आज आंतरवाली सराटीत बोलावली होती. जरांगे नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र हा निर्णय दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच 2 नोव्हेंबरला जाहीर करू असं त्यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आज जरांगे यांनी याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत मराठा-दलित-मुस्लिम एकत्र येण्यावर एकमत झालं असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता आम्ही एकत्र आलो असून सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दावाही जरांगे यांनी केला आहे.
मराठा-दलित-मुस्लिम एकत्र येण्यावर आमचं एकमत झालं असलं तरी कोणत्या जागा कोण लढणार? यावर 3 तारखेला निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. आमचे उमेदवार कोण? हे 3 तारखेला जाहीर करू, अशी त्यांनी सांगितलं. सर्व मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, आम्ही एकाला उमेदवार म्हणून घोषीत केल्यानंतर इतरांनी अर्ज मागे घेण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.