VIDEO : जरांगेंची फडणवीसांवर पुन्हा टीका; पाहा काय म्हणाले मनोज जरांगे

Manoj Jarange Patil : आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आता कुणालाही शक्ती दाखवायची नाही. आपली शक्ती देशाने पाहिली आहे. आता समाज एकतर्फी आहे. आज इच्छुक उमेदवारांची बैठक आहे.. मुलाखती नाहीत. ज्यावेळेस लढायचे की पाडायचे हे ठरले त्यानंतर मुलाखती होतील. आज चर्चा करणं महत्त्वाचं होतं, माझ्या समाजासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. 20 तारखेला पुढची निर्णायक बैठक होणार आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हंटलं आहे. आज अंतरावली सराटीमध्ये झालेल्या इच्छुक उमेदवारांसोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षण मागतो म्हणून, मी जातियवादी नाही. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे. जात आम्हाला कधी शिवली नाही. कारण आम्हाला शेतकरी, मुस्लिम, गोरगरीब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. यांना आता पाडापाडीची भीती वाटायला लागली का? यांचा मालक लैच तोऱ्यात होता. आमच्या डोळ्यादेखत दुसऱ्या जाती आरक्षणात घातल्या. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे त्यांना भोगावं लागेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीवरुन त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com