VIDEO | छगन भुजबळांना दंगल घडवायचीय; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

डॉ. माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप केलाय. मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरुय. मी मूळ मुद्दा मांडल्यानं ओबीसी नेत्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे. मराठा नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. असं ते म्हणाले. मी एकटा पडलोय. समाजाच्या नेत्यांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन करतानाच जरांगेंनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय.

भुजबळ म्हणाले की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा. याचा अर्थ यांना दंगल घडवायची आहे. मराठ्यांनी तयार राहावं. यांनी दंगल घडवली तर माझ्या एकाही माणसाला काही होता कामा नये, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com