Manoj Jarange : मनोज जरांगेंनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट | VIDEO

Somnath Suryawanshi Death Case : परभणी येथील घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. जरांगे हे २ दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी आज सूर्यवंशी कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केलं. या आंदोलनात पोलिसांनी काही आंदोलकांना तब्यात घेतलं होतं. यात सोमनाथ सूर्यवंशी देखील होते. यावेळी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पोलिसांवर कारवाईची मागणी देखील होत आहे. याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील यांनी बीड दौऱ्यादरम्यान पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सूर्यनावशी यांच्या आईसोबत बातचीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com