Breaking News : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांची धरपकड; पोलिसांची वाहने खचाखच भरली, पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Breaking News : मराठा समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने शहरातील केंब्रिज चौकात एकवटले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे. आज रविवारी (ता २२) त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा ६ वा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे सकल मराठा समाज बांधव हे आक्रमक होत आहेत. विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात येत आहे.

आज छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात सकल मराठा समाजाकडून रस्ता रोको करण्यात आलं. मराठा समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने शहरातील केंब्रिज चौकात एकवटले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मराठा बांधवांनी राज्य सरकारविरोधात देखील मोठा रोष व्यक्त केला. यावेळी शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आणखीच आक्रमक पवित्रा घेतल्या. त्यामुळे आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये डांबलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com