Maratha Aarakshan Andolan: आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार, आझाद मैदान परिसरात जिकडे-तिकडे गर्दी; पाऊल ठेवायला जागा नाही, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil at Azad Maidan: मनोज जरांगे पाटील आज १० वाजता मुंबईतील आझादा मैदानावर उपोषणासाठी बसणार आहेत. ते थोड्यात वेळात आझाद मैदानावर दाखल होतील. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर मोठी गर्दी केली आहे.

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सटारी ते मुंबईपर्यंत मोर्चा काढत मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आझाद मैदान आणि सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जात आहे.

मनोज जरांगे आज १० वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. ते थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहचतील. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मराठा आंदोलक आधीच आले आहेत. ते ढोल-ताशाच्या गजरामध्ये जरांगेचे स्वागत करणार आहेत. आझाद मैदान परिसरामध्ये इतकी गर्दी आहे की पाऊल ठेवायला देखील जागा नाही. आझाद मैदान परिसरामध्ये पोलिसांचा तगडदा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com