Mahayuti - MNS Breaking : मनसेला महायुतीचा बिनशर्त पाठिंबा ? मध्यरात्रीच्या बैठकीत काय झाली चर्चा, पाहा Video

Mahayuti Thinking To Support MNS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून विधानसभेला महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये या संदर्भात चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर पाठिंबा देण्यासंदर्भात ही चर्चा झाली असून महायुती व मनसेच्या पुढील निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता विधानसभेत महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याअनुषंगाने शनिवारी रात्री मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. साधारण दोन तास चाललेल्या या बैठकीत ज्या ठिकाणी मनसेचं प्राबल्य आहे अशा काही जागांवर हा पाठिंबा दिला जाणार आहे. यात शिवडी, वरळी, माहिमसह काही मतदारसंघांवर महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता महायुती व मनसे आगामीकाळात याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com