VIDEO : महायुतीचं रिपोर्ट कार्ड; अडीच वर्षांतील कामाचा दिला लेखाजोखा

Mahayuti Report Card : विधानसभा निवडणुकीचं बीगुल वाजल्यानंतर महायुती सरकारकडून त्यांच्या अडीच वर्षांतील कामाचा लेखाजोखा जनतेसाठी प्रकाशित करण्यात आला आहे.

विधानसभा जाहीर होताच महायुतीकडून अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपलं रिपोर्ट कार्ड सादर केलं आहे. हे दोन पानांचं रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मविआवर जोरदार हल्ला केला. लाडकी बहीण योजनेसाठी आमचं टार्गेट २ कोटी ५० लाख होते. आता २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले. नोव्हेंबर महिन्यात आचरसंहिता लागणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे ते पैसे ऑक्टोंबर महिन्यात देऊन टाकले, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

त्याचबरोबर शासन आपल्या दारी योजनेतून 5 कोटी लोकांना लाभ मिळाले. महायुती सरकारने दोन अडीच वर्षांत जे कामे केली आहे, ते समोर ठेवले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचवण्याच्या योजना आम्ही आणल्या आहे. १४५ सिंचन योजना आम्ही आणल्या आहेत. दोन अडीच वर्षांत आम्ही ९०० निर्णय घेतले आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com