Jogeshwari Constituency : जोगेश्वरीच्या जागेवरून महायुतीत वाद; भाजप पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

BJP Assembly Election News Update : जोगेश्वरी मतदारसंघावरून महायुतीत वाद सुरू असून माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेल्या आहेत.

जोगेश्वरी मतदारसंघावरून महायुतीत टोकाचा वाद सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या अनुषंगाने भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्या आहेत. खासदार रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विधानसभेतुन लढण्यासाठी मोडक इच्छुक आहेत. रविंद्र वायकर मात्र स्वतःच्या पत्नीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता वायकर यांच्या पत्नीला तिकिट दिल्यास भाजपचे पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता या जागेवरून वाद निर्माण झाला आहे.

जोगेश्वरी मतदारसंघाची जागा विधानसभेला भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र या जागेवर रविंद्र वायकर स्वतःच्या पत्नीसाठी आग्रही आहेत. तर ही जागा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. याचसाठी माजी नगरसेवक उज्ज्वला मोडक या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यामुळे वायकर यांच्या पत्नीला तिकिट दिल्यास भाजपचे पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com