Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

Assembly Election News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही महत्वाच्या बैठकीसाठी दिल्लीकडे रवाना झाले असून एकनाथ शिंदे देखील दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. महायुतीतील काही जागांच्या वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या बाबत तोडगा काढण्यासाठी आज भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत आज चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे. त्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच उरलेले आहेत. त्यातच महायुतीत अनेक जागांवर अद्याप चर्चा होणं बाकी आहे. त्यामुळे या जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. आत्तापर्यंत महायुतीकडून 182 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत उरलेल्या 106 जागांवर चर्चा होऊन या जागांचे वाटप केले जेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com