Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

Dispute in Congress vs Thackeray Faction: महाराष्ट्र विधानसभेत बसण्याच्या व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला. ज्यामुळे विरोधी गटात राजकीय तणाव निर्माण झाला. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांच्या मागे बसण्याची वेळ आली होती.

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

विधानसभेतील आसनांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाला. काँग्रेसचे आमदार वरिष्ठतेचा आणि संख्याबळाचा दाखला देत पुढील रांगांवर दावा सांगत होते. काँग्रेसच्या १६ आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढच्या रांगेत जागा देण्यात आली होती, तर ठाकरे गटाच्या २० आमदारांपैकी १४ जण पुढे बसत होते. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांच्या मागे बसण्याची वेळ आली होती, यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर अध्यक्षांनी मध्यस्थी करून ठाकरे गटाच्या दोन पुढील जागा कमी केल्या आणि त्या काँग्रेसला देण्यात आल्या. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या १४ ऐवजी १२ आमदारांना पुढे जागा मिळणार आहेत, तर काँग्रेसचे पुढे बसणारे आमदार ४ वरून ६ इतके होतील. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाकरे गट नाराज असून, परंपरा आणि प्रथेनुसार त्यांचा दावा योग्य असल्याचे ते सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com