Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी भाजपला हव्यात १६० जागा; शिंदे-पवार यांच्या वाट्याला काय, पाहा VIDEO

Mahayuti Seat Sharing Issue BJP May Contest 160 Seats : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजप विधानसभा निवडणुकीत किती जागा लढणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबई : यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये १६० जागा भाजपने लढवाव्यात, असा आग्रह भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १२५ जागांवर तयारी सुरू केलीय. त्यामुळे उर्वरित १२८ जागांसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना समाधान मानावं लागेल, असं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपाला उशीर झाला होता, त्याचा फटका मतांवर झाल्याचं दिसलं. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासुनच तयारी सुरू केलीय.

राज्यातील ५० जागा भाजपने निश्चित केल्या असल्याची माहिती मिळतेय. या जागांवर उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, अशी खात्री भाजपला आहे. मात्र, इतर ७५ जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप विशेष रणनीती आखत आहे. या ७५ जागा निवडून आणण्याची राज्यातील बड्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलीय. प्रत्येक बड्या नेत्यावर विधानसभेच्या ७ ते ८ मतदार संघाची जबाबदारी देण्याचं नियोजन आहे. त्या नेत्यांनी आपल्या अहवाल नेतृत्त्वाकडे द्यायचा असून संबंधित भाजप नेत्यांनी आपले दौरे देखील सुरू केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com