विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, पाहा किती दिवस शाळा बंद राहणार? VIDEO

Maharashtra School Diwali Vacation 2026: महाराष्ट्रातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुट्ट्यांनंतर शाळा कधी सुरू होणार आणि दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाने काय माहिती दिली आहे, जाणून घ्या सविस्तर.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार 2 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी असणार आहे.

या कालावधीत विद्यार्थ्यांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळणार आहे. दिवाळीच्या 15 दिवसांच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळांचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना या वेळापत्रकाचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com