VIDEO: सर्वत्र चिखल अन् घाणीचे साम्राज्य; पुण्यात पावसाची सध्याची परिस्थिती काय?

Pune Rain News Flood Like Situation Video: पुण्यात आता पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसत आहे. परंतु पावसामुळे सर्वत्र चिखल अन् घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय.

मुंबई: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू होती, तर काल मुसळधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. जोरदार पावसामुळे शहरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होते. रस्त्यावर पाणी साचले होते, तर नदी-नाले ओसांडून वाहत होते. पूलावरून देखील पाणी वाहत असल्याचं समोर आलं होतं. घरांमध्ये पाणी शिरलं होतं, तर रस्त्यावर अनेक वाहने वाहून गेले होते. त्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. परंतु पावसामुळे सर्वत्र चिखल निर्माण झालाय.

पावसाच्या पाण्यामुळे साप, विंचू रस्त्यावर आले होते, तर घरांमध्ये देखील शिरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. या पावसामुळे शहरात सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. मुळा नदी दुथडी भरून वाहत होती. अनेक रस्ते पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पुण्यात खिलारेवाडीमध्ये पावसाने मोठं नुकसान झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com