Maharashtra Politics : मी काय म्हातारा झालोय का? वयावरून शरद पवारांनी घेतली फिरकी, VIDEO

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा वयावरून बोलणाऱ्या नेत्यांना उत्तर दिलं आहे. मी काय म्हातारा झालोय का? असा सवाल त्यांनी केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वयावरून विरोधकांकडून अनेकदा टीका करण्यात येते. याशिवाय महाविकास आघाडीतील अनेक नेते सुद्धा पवार यांच्या वयाचा दाखला देत राजकारणातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण शरद पवार यांनी यापूर्वीही वयावरून बोलणाऱ्या नेत्यांची फिरकी घेतली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत असेच वयावरून वक्तव्य केले होते. त्यावेळी हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, असे म्हणाले होते. आता भोसरीतील सभेत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचीही फिरकी घेतली.

सचिन अहिर यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं. ते मी ऐकलं. या वयातही काम करतात असे म्हणाले. मग मी काय म्हातारा झालोय का? ८४ हे काय वय आहे? अजून १६ बाकी आहेत, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले. पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. गर्दीतून टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या.

याशिवाय शरद पवार यांनी याच सभेत लाडकी बहीण योजनेसह महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरले. राज्यात महिला अत्याचाराचा घटना वाढत आहेत. शेकडो तरुणी अचानक बेपत्ता होतात. अशा परिस्थितीत महिला आणि मुलींची सुरक्षा गरजेची असल्याचं सांगत त्यांची सुरक्षा कशी करणार, असा खडा सवालही त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com