VIDEO: महायुतीत बिघाडी? शिंदे गटाच्या नेत्याचं भाजप आमदाराविरोधात उपोषण, प्रकरण काय?
मुंबई: एसआरए सर्वेक्षणावरून नवी मुंबईत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली असल्याचं समोर आलंय. एसआरए सर्वेक्षणावरून दोन्ही गटातील नेते आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजप गटाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे गटाचे विजय चौगुले आमरण उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघा झोपडपट्टीच्या एसआरए सर्वेक्षणाला मंजूरी दिली होती, मात्र गणेश नाईकांनी स्वार्थापोटी राजकीय दबाव वापरले. सर्वेक्षण बंद पाडलं, असा आरोप विजय चौगुले यांनी केलाय.
तसंच झोपडपट्टीचं बायोमॅट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा देखील चौगुले यांनी दिलाय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी गणेश नाईक यांची सध्याची परिस्थिती असल्याची टीका चौगुले यांनी केलीय. १० ते १५ टक्के लोकांचा सर्वेक्षण झालं होतं. त्यानंतर राजकीय दबाव वापरून ते बंद केल्याचा आरोप चौगुले यांचा आहे. झोपडपट्टीतील लोकांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी उपोषण करत असल्याची प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.