Maharashtra Politics : विमा कंपनीवर कडक कारवाई करणार, अजित पवारांचा शब्द; पाहा रविकांत तुपकर काय म्हणाले?

Ravikant Tupkar Meet Ajit Pawar : आज शेतकरी नेते रविकांत तुपकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आहे. या भेटीत नेमकं काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबई : शेतकरी नेते रविकांत तुपकर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शेतकरी कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे. लाडक्या बहिणीला 46 हजार कोटी रुपये दिले आहेत, आता राज्यांतील शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा. सोयाबीनला योग्य भाव मिळायला हवा. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केलीय.

कांदा, दूध उत्पादक शेतकरी धान, सोयाबीन शेतकरी अडचणीत आहेत, यावर तात्काळ तोडगा काढावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज आमची सरकारसोबत बैठक झाली. सोयाबीन, कापूस यांच्या दरवाढीसाठी अमित शहा याच्याकडे शिष्टमंडळ जाणार आहे. कर्जमाफीच्या योजनेत लोकांचे पैसे बाकी आहेत. ते पैसे आम्ही देतो, विमा कंपनीवर आम्ही कडक कारवाई करतो, असा शब्द अजित पवारांनी दिला असल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com