Maharashtra Politics : विधानसभेसाठी अजित पवारांनी किती जागा मागितल्या? छगन भुजबळांच्या उत्तराने शिंदे गटाला धडकी

Maharashtra Political News : अजित पवार गटाने महायुतीत किती जागा मागितल्या असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला यावर छगन भुजबळांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वत:अजित पवार महाराष्ट्रात दौरे करून विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच महायुतीत अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. कारण, भाजपने जवळपास १५० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील १०० ते १२० जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच अजित पवार गटाने महायुतीत किती जागा मागितल्या असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला यावर छगन भुजबळांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "आमचे कारभारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल असून ते जागावाटपाबाबत सगळं पाहत आहेत. सध्यातरी मी कुठल्याही चर्चेत जास्त लक्ष घालत नाही. विधानसभेसाठी किती जागा मागितल्या हे त्यांनी मला सांगितले नाही. पण ८० ते ९० जागा मागितल्या असं माझ्या कानावर आले आहे. त्याच्यावर किती निकाल येतो, याची कल्पना नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या या उत्तराने शिंदे गटाला धडकी भरली आहे. कारण, विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यातून भाजपने १५० आणि अजित पवार गटाने ९० जागा लढवल्या, तर खाली फक्त ४८ जागा शिल्लक उरतात. त्या शिंदे गट घेणार का? हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Political News
Sillod Politics : अब्दुल सत्तारांमुळे सिल्लोडचा पाकिस्तान होतोय; शिवना येथील घटनेवर रावसाहेब दानवे संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com