Maharashtra Politics : 'वर्षा'वर रात्री उशिरा महायुतीची खलबतं; तिन्ही नेते एकत्र, पाहा VIDEO
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. काल २२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री निवासस्थानी वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक झाल्याचं समोर आलंय. वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय विषयांवर खलबतं झाल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात अनेक महत्वाच्या विषयवांर चर्चा झाल्याचं समोर येतंय. यापूर्वी काल संध्याकाळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तीन्ही नेत्यांमध्ये राज्यातील महिलांवरील अत्याचार, विरोधकांचा नरेटिव्ह आणि लाडकी बहीण योजनेवरून महत्वाची चर्चा झाल्याचं समोर येतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.