भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत, दीपक केसरकरांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल|VIDEO

Deepak Kesarkar Slams BJP: कोकणातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दीपक केसरकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला मतदान करणे म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला असून, भाजप उमेदवाराला मराठीही बोलता येत नसल्याचे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोंकणामध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये शिंदेसेना आणि भाजप असा संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चार मराठी शब्द बोलता येत नाही, असे म्हणत केसरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत यांना टोला लगवाला आहे.

भाजपला मतदान करणे म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखे आहे. असा जोरदार हल्लाबोल केसरकर यांनी केला. नारायण राणे यांनी युतीचे आदेश देऊनही भाजपने ते पाळले नाहीत आणि आपल्या विरोधात षडयंत्र रचले, असे केसरकर म्हणाले. विरोधी उमेदवारांना भाजप फायनान्स करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com