Maharashtra Politics: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये हायव्होल्टेज लढती; महापालिका निवडणुकांमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला|VIDEO

Maharashtra Municipal Elections Announced: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची थेट लढत पाहायला मिळणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत 29 महापालिकेचे निवडणूक आयोगाचे वेळापत्रक जाहीर केले. 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महापलिका निवडणुका प्रलंबित होत्या. अखेर या निवडणुकांचे बिगूल वाजले. मात्र आता या निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

मुंबईमध्ये ठाकरे बंधु विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, ठण्यात रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण, छत्रपती सांभाजीनगरमध्ये अतुल सावे विरुद्ध संजय शिरसाट, तर नाशिक महापालिकमध्ये दादा भुसे, गिरीश महाजन आणि छगन भुजबळ या बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com