Latur Drought : लातूरमध्ये भीषण दुष्काळ! व्यथा सांगताना शेतकरी मुख्यमंत्र्यांना मिठी मारत ढसा ढसा रडला, पाहा VIDEO

Latur CM Devendra Fadnavis Farmer Drought News : लातूर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

लातूर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री समोर येताच एका शेतकऱ्याला आपल्या भावना अनावर झाल्या. संबंधित शेतकरी ढसाढसा रडत मुख्यमंत्र्यांकडे आला आणि त्याने आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी फडणवीस यांनी त्याला मिठी मारत धीर दिला.

लातूरमध्ये यंदा अपेक्षेच्या तुलनेत केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून, मदत सरसकट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. “संकटात तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com