पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक बकरी आणि बोकड भेट, महाराष्ट्र राज्य खाटिक समाजाचा निर्णय|VIDEO

Maharashtra Khatik Community: महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी खाटीक समाजाने एक अनोखी मदत योजना राबविली आहे. जिल्हाधिकारी उपस्थितीत, पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना बकरी व बोकड भेट देण्यात येणार आहेत.

राज्यात पावसाने यंदा थैमान घातल असून मराठवाडा सोलापूर, जालना, मध्य या भागतील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट बरंसल आहे. शेतातील पिके तर नष्ट झालीच आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांचे पशुधन म्हणजेच गाय बैल शेळ्या सर्व पाण्यात वाहून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून आता पुन्हा एकदा शून्यातून शेतकऱ्यांना आपल विश्व निर्माण करायच आहे. या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आले आहेत. खाद्यपदार्थ तसेच जीवन उपयोगी वस्तू पूरग्रस्तांना देण्यात येत आहे.

मात्र राज्य खाटीक समाजाच्या. वतीने पूरग्रस्तांना अनोखी भेट देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांना उपस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले आहे किंवा मृत्युमुखी पडले आहे अशा शेतकऱ्यांना एक बकरी आणि बोकड भेट देण्यात देणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केली आहे आयुष्यभर शेतकऱ्यांनी विकलेल्या जनावरांवर उदरनिर्वाह करीत असलेल्या खाटीक समाजाने एकजूट दाखवत यंदा जानवरं न कापता पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून " कटेंग नाही बटेंगे " हे अभियान राबविणार आहेत अशी माहिती शेख यांनी दिली.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com